S M L

राहुल गांधी उत्तराखंडमध्ये; काँग्रेस नेते जगदीश शर्मा यांचा दावा

Samruddha Bhambure | Updated On: Feb 25, 2015 12:30 PM IST

राहुल गांधी उत्तराखंडमध्ये; काँग्रेस नेते जगदीश शर्मा यांचा दावा

[wzslider autoplay="true"]

25 फेब्रुवारी : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून सुट्टीवर असलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी कुठे चिंतन करत आहेत, असा सवाल विचारला जात आहे. अखेर आज (बुधवारी) या प्रश्नाला उत्तर देत, राहुल हे भारतातच असून उत्तराखंडमध्ये एका कॅम्पमध्ये असल्याचा दावा प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वडरा यांचे निकटवर्तीय जगदीश शर्मा यांनी केला आहे.

काँग्रेस पक्षाच्या भवितव्याचा विचार करण्यासाठी राहुल गांधींनी घेतलेल्या सुटीवर आता इतरांसोबतच खुद्द काँग्रेस पक्षातूनही टीका व्हायला लागलीये. काँग्रेसकडून राहुल हे सुटी घेऊन परदेशात गेल्याचे सांगण्यात येत होते. पण, राहुल हे भारतातच असून उत्तराखंडमधल्या एका कॅम्पमध्ये असल्याचा दावा इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसचे उपाध्यक्ष जगदीश कुमार शर्मा यांनी केला आहे. त्यांनी राहुल गांधींचे काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. राहुल गांधी परदेशी गेलेत अशा अफवांना खोटं ठरवण्यासाठी आपण हे फोटो प्रसिद्ध केले, असं शर्मांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे राहुल यांच्या कार्यालयाने हे फोटो आताचे नसून 2008मधले असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, भूसंपदान विधेयकावरून जंतरमंतरवर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली होणार्‍या या आंदोलनात ते सोडून आता पक्षाचे अहमद पटेल, दिग्विजय सिंग, जयराम रमेश, अजय माकन, सलमान खुर्शीद, मधुसुदन मिस्त्री, राज बब्बर असे दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. आज दुपारी 12 वाजता हे आंदोलन होणार आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधी चिंतन करण्यासाठी रजेवर गेल्याचं सांगत असले तरी कार्यकर्त्यांमध्ये यातून विपरित संदेश जात आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 25, 2015 12:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close