S M L

पवारांनी घेतली मोदींची भेट, 'भूसंपादना'ला दर्शवला विरोध

Sachin Salve | Updated On: Feb 25, 2015 10:31 PM IST

beed_pawar_modi25 फेब्रुवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (बुधवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पार्लमेंट हाऊसमध्ये ही भेट झाली. या भेटीत भूसंपादन वटहुकूमावर चर्चा झाल्याचं समजतंय. यावेळी पवारांनी भूसंपादन विधेयकाच्या तीन मुद्यांना विरोध दर्शवला असून कायद्यातील बदलाला पाठिंबा देण्यास नकार दिलाय.

भूसंपादन विधेयकाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संसदेत पंतप्रधानांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. यूपीए सरकारच्या काळात शेतकर्‍यांच्या सहमतीची तरतूद केली होती. ती तरतूद रद्द करण्यात आलीये. तसंच सोशल इम्पॅक्ट ऍसेसेमेंटबाबतही तसंच केलंय आणि शेतकर्‍याची घेतलेली जमीन जर 5 वर्षे वापराविनाच पडून राहिली, तर ती परत द्यायला हवी अशी तरतूद केली होती. ती बदलण्याचा विचारही सुरू आहे. या तिन्ही गोष्टींना पवारांनी विरोध केलाय. या विधेयकाबाबत सर्वच राजकीय पक्षांशी विचारविनिमय करू, असं सरकारने स्पष्ट केलंय पण आम्ही केलेल्या कायद्यात प्रस्तावित केलेले हे बदल आम्हाला मान्य नाहीत. हे मुद्दे लक्षात घेता आम्ही या विधेयकाला पाठिंबा देऊ शकणार नाही, हे आम्ही चर्चेदरम्यान सरकारच्या निदर्शनास आणून देऊ असंही पवारांनी स्पष्ट केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 25, 2015 07:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close