S M L

प्रभूंची हायटेक एक्स्प्रेस !

Samruddha Bhambure | Updated On: Feb 26, 2015 04:22 PM IST

प्रभूंची हायटेक एक्स्प्रेस !

26 फेब्रुवारी : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज (गुरूवारी) संसदेत रेल्वे बजेट सादर केलं. यावेळी रेल्वे बजेटमध्ये ना नव्या गाड्यांच्या घोषणांचा पाऊस पाडला आहे, ना प्रवाश्यांच्या प्रवासाचा खर्च वाढवण्यात आला आहे. तरीही यंदाचं रेल्वे बजेट लक्षणीय ठरलंय ते प्रभूंच्या टेक्नोसेव्ही निर्णयांमुळे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून प्रवाशांना जास्त सुविधा देण्यावर भर दिला आहे.

महत्वाच्या घोषणा :

 • महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कॅमेरे लावणार
 • रेल्वे ऑपरेशन पाच मिनिटं राबवणार, पाच मिनिटांत मिळणार तिकिट
 • लवकरात लवकर तिकीट देण्याचे लक्ष्य, यासाठी डेबिट कार्ड ऑपरेटेड मशीन्स
 • सर्व ए वन स्टेशनवर वाय फाय पुरूविणार
 • जनरल क्लासमध्येही मोबाइल चॉर्जिंग सुविधा देणार
 • 1 मार्चपासून मोबाईल ऍपच्या माध्यमातून तक्रार दाखल करता येणार
 • IRCTC वेबसाइट विविध भाषांमध्ये आणणार
 • 108 ट्रेन्समध्ये ई-केटरिंगची सुविधा देणार
 • डेबिट कार्डावरून तिकीट काढण्याची विशिष्ट सुविधा
 • फोनवरूण करता येणार तिकिटाचं रिझर्व्हेशन
 • 400 स्टेशनवर वाय-फाय सुविधा
 • व्हिल चिअरसाठी ऑनलाइन बुकिंग सुविधा

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 26, 2015 03:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close