S M L

भूसंपादन अध्यादेश मागे घेण्याचा प्रश्नच नाही -नायडू

Sachin Salve | Updated On: Feb 27, 2015 11:59 AM IST

भूसंपादन अध्यादेश मागे घेण्याचा प्रश्नच नाही -नायडू

27 फेब्रुवारी : भूसंपादन अध्यादेशासह कोणताही अध्यादेश मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केलंय. यासंबंधीचा निर्णय संसदेलाच घेऊ द्या असा सल्लाही त्यांनी दिला.

मात्र, ही संबंधित विधेयकं संसदेत चर्चेसाठी आल्यानंतर त्यावरच्या सूचनांचा विचार करायला सरकार तयार आहे असंही त्यांनी सांगितलं. त्याचवेळी काँग्रेसवर त्यांनी दुटप्पीपणाचा आरोप केला. ही विधेयकं मंजूर करून घ्यायला सरकारला काहीही अडचण येणार नाही, कारण सर्व मित्र पक्ष सरकारच्या बाजूने आहेत असा विश्वासही नायडू यांनी व्यक्त केला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 27, 2015 11:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close