S M L

बजेटमधील 15 प्रमुख मोठे मुद्दे !

Sachin Salve | Updated On: Feb 28, 2015 09:49 PM IST

बजेटमधील 15 प्रमुख मोठे मुद्दे !

28 फेब्रुवारी : अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मोदी सरकारचा पहिलावहिला संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. जेटलींनी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्यात. कुठे सर्वसामान्यांना दिलासा, तर कुठे मध्यमवर्गीयांना झटका दिलाय. तर कुठे कार्पोरेटकरांसाठी पायघड्या घालण्यात आल्या आहे. नेमकं या बजेटमध्ये अशा कोणत्या घोषणा आहे ज्याचा फायदा आणि तोटा काय आहे ? जाणून घ्या बजेटमधील हे 15 मुख्य मुद्दे...

1) पंतप्रधान सुरक्षा विमा योजना

या योजनेत फक्त 12 रुपयांमध्ये वर्षाला दोन लाखांचा विमा मिळणार आहे. म्हणजे फक्त प्रतिमहा 1 रुपये प्रीमियमवर दोन लाखांचा अपघात विमा दिला जाणार आहे.

2) अटल पेन्शन योजना

अटल पेन्शन योजनेसाठी सरकार 50 टक्के निधी भरणार आहे. 31 डिसेंबरपूर्वी अकाऊंट उघडणार्‍या गरिबांना वयाच्या 60 वर्षांपासून पेन्शन सुरू होणार आहे.

3) इन्कम टॅक्स जैसे थे

सर्वसामान्य नोकरदारांना टॅक्समध्ये सूट देण्यात आली आहे पण कोणताही नवी घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे जुन्या टॅक्स

स्लॅबनेच कर भरावा लागणार आहे.

4) सर्व्हिस टॅक्समध्ये वाढ

सेवा कर 12.26 वरून आता 14 टक्के करण्यात आली आहे. त्यामुळे दैनदिन वापरातील अनेक वस्तू महाग होणार आहे. रेस्टॉरेंट, हॉटेल, ब्युटी पार्लर, हॉस्पिटलमध्ये सेवा टॅक्सच्या नावाखाली जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

5) काळ्या पैशासाठी कायदा

काळ्या पैश्याच्या मुद्यावर आजपर्यंत अनेक हालचाली झाल्यात पण आतापर्यंत काहीही निष्पन्न झालं नाही. त्यामुळे काळा पैसा रोखण्यासाठी नवीन विधेयक आणलं जाईल आणि ते याच अधिवेशनात सादर होईल अशी घोषणा करण्यात आलीये.

6) अल्पसंख्यांकांसाठी नई मंजिल योजना

मुस्लीम समाजाची खास दखल घेत मुस्लीम तरुणांना रोजगार मिळण्यासाठी या योजनेची घोषणा करण्यात आलीये. एवढंच नाहीतर या योजनेचा मुस्लीम तरुणांना शिक्षणाचाही फायदा मिळणार आहे

7) पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी

पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी 70 हजार कोटींची तरतूद करण्यात आलीये. विकास दर वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर देण्यात आलाय. यासाठी टॅक्स फ्री इंफ्रास्ट्रक्चर बाँड जारी करण्यात आलाय. 2015-16 पायाभूत क्षेत्रात 700 अब्ज गुंतवणूक होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तसंच यासाठी पीपीपी मॉडेलवर विचार केला जाणार आहे.

8) मेक इन इंडिया

'मेक इन इं़डिया'च्या माध्यमातून भारतात गुंतवणूकदारांसाठी हब उभारला जाणार आहे. सुरक्षा क्षेत्रात 2.46 कोटींची तरतूद करण्यात आलीये. मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरक्षा क्षेत्राचा वापर केला जाणार आहे.

9) सोने द्या, पैसे घ्या !

सोन्याच्या ऐवजी पैसे अशी योजना सुरू करण्यात येणार आहे. भारतात अशोकचक्र असलेले सोन्याची नाणी चलनात आणून विदेश नाण्यांची मागणी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी गोल्ड बाँड जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे थेट गुंतवणूक करता येईल.

10) नवीन एम्स, आयआयएम आणि आयआयटी

जम्मू-काश्मीर, पंजाब, तामिळनाडू आणि आसाममध्ये आयआयएमएस उभारण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीर आणि आंध्र प्रदेशमध्ये आयआयएम सुरू करण्यात येईल. त्याचबरोबर कर्नाटकमध्ये आयआयटी उभारणार आहे. हिमाचल आणि बिहारमध्ये एम्स इंस्टिट्यूट सुरू करण्यात येईल. धनबादमध्ये स्कूल ऑफ माइंसची पूर्नरचना करून आयआयटीचा दर्जा देण्यात येणार आहे.

11) कॉर्पोर्रेट टॅक्समध्ये कपात

टॅक्समधून येणारा पैसा हा जनतेच्या विकासासाठी खर्च केला जाईल असं जेटली यांनी स्पष्ट केलं. त्याबरोबर त्यांनी कार्पोरेट टॅक्समध्ये 30 टक्के जास्त असून ती आता 5 टक्क्याने कमी करून 25 टक्के करण्यात येईल असं जाहीर केलं.

12) पॅन कार्ड गरजेच !

एक लाखांपेक्षा जास्त खरेदी करण्यासाठी आता पॅन कार्ड गरजेचं असणार आहे. तसंच संपत्ती कर रद्द करण्यात आला असून एक कोटीपेक्षा जास्त उत्पन्नावर 2 टक्के कर लागणार आहे. तर दुसरीकडे 22 वस्तूंवर कस्टम ड्युटीत कपात करण्यात आली आहे.

13) मनरेगा योजनेसाठी निधी

यूपीए सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेल्या महत्वाकांक्षी मनरेगा योजनेसाठी 34,699 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कालच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनरेगा योजना ही काँग्रेस सरकारच्या अपयशाचं स्मारक आहे अशी टीका केली होती.

14) सबसिडीसाठी नियोजन

सबसिडीसाठी नव्याने नियोजन करण्यात आले आहे. यासाठी जॅम संकल्पनेचा वापर अर्थात जे-जनधन, ए-आधार, एम-मोबाईलचा वापर होणार आहे. त्यामुळे ज्यांचे उत्पन्न जास्त आहे असे नागरीक गॅसची सबसिडी घेऊ शकणार नाही.

15) महागाईवर नियंत्रणासाठी समिती

महागाईचा दर कमी करण्यासाठी वेगळ्या समितीची घोषणा कऱण्यात आलीये. महागाई दर 5 टक्क्यांपेक्षा खाली आणण्याचं लक्ष्य जेटलींनी ठेवलंय. यामुळे विकास दर 8 ते 8.5 टक्के राहिल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

===================================================================================

संबंधित बातम्या

पर्यटनाची चकाचक घोषणा पण खिसा तुमचा खाली !

‘बुरे दिन’ येणार, काय होणार महाग ?

बजेट : कॉर्पोरेटसाठी पायघड्या, मध्यमवर्गीयांच्या खिशाला कात्री !

बजेटमधील महत्वाच्या घोषणा

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 28, 2015 07:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close