S M L

पेट्रोल 3 रूपये18 पैसे तर डिझेल 3 रूपये 9 पैशांनी महागले

Sachin Salve | Updated On: Feb 28, 2015 08:23 PM IST

petrol_price_hike28 फेब्रुवारी : अर्थमंत्री अरूण जेटली यांनी बजेट सादर करून काही तास उलटत नाही तेच सर्वसामान्यांना दणका बसलाय. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आलीये. पेट्रोल 3 रूपये 18 पैशांनी तर डिझेलच्या दरात 3 रूपये 9 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून आंतराष्ट्रीय बाजारात क्रुड तेलाच्या किंमतीत कपात झाल्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कमालीची कपात करण्यात आली होती. मात्र, अलीकडेच क्रुड तेलाच्या दरात वाढ होत असल्यामुळे पुन्हा एकदा दरवाढीने डोकंवर काढलंय. मागील आठवड्यात पेट्रोल 82 तर डिझेलच्या दरात 61 पैशांनी वाढ करण्यात आली होती. आता क्रुडच्या किंमती 62.58 डॉलर इतकी पोहचल्यामुळे पुन्हा दरवाढ करण्यात आलीये. आजची दरवाढ मागील काही दरवाढीची कसरच भरून काढलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 28, 2015 08:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close