S M L

मुफ्ती मोहम्मद सईद जम्मू-काश्मिरचे नवे मुख्यमंत्री

Samruddha Bhambure | Updated On: Mar 1, 2015 06:31 PM IST

मुफ्ती मोहम्मद सईद जम्मू-काश्मिरचे नवे मुख्यमंत्री

BRKING940_201503011517_940x355

01 मार्च : पीडीपी आणि भाजपमध्ये दोन महिने चाललेल्या दीर्घ चर्चेनंतर अखेर आज जम्मू-काश्मीरला नवे सरकार मिळाले आहे. मुफ्ती मोहमद सईद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत जम्मू-काश्मीरचे १२ वे मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, भाजप नेते निर्मल सिंह यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

मुफ्ती यांनी गुरुवारी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना आमंत्रण दिले होते. जम्मू-काश्मीरच्या इतिहासात प्रथमच भाजप सत्तेत सहभागी होणार आहे. दोन्ही पक्षांनी समन्वयाने सरकार चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांच्यासह सर्व मंत्र्यांना राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी शपथ दिली. सईद 25 सदस्यांच्या मंत्रिमंडळाचे नेतृत्त्व करतील. त्यात उपमुख्यमंत्रीपदासह 12 भाजपचे आणि उर्वरित 12 पीडीपीचे मंत्री असतील. याबरोबरच राज्यातील ४९ दिवसांची राज्यपाल राजवटही संपुष्टात आली आहे.

87 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत पीडीपीला 28 तर भाजपला 25 जागांवर विजय मिळाला होता. पीडीपी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. तर नॅशनल कॉन्फरन्सला 15 आणि कांग्रेसला 12 तसेच 2 जागा सज्जाद लोन यांच्या पिपल्स कॉन्फरन्सला मिळाल्या होत्या.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 1, 2015 11:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close