S M L

प्रकाश आंबेडकर यांची चौथी आघाडी

24 सप्टेंबर राज्यात आता सेक्युलर फ्रंटच्या नावाने प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली चौथी आघाडी अस्तित्वात येत आहे. त्यामध्ये आसाममध्ये 21 आमदारांचं पाठबळ असलेल्या युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे फक्रुद्दीन अजमल आणि उत्तर प्रदेशच्या राजकारणात स्थान निर्माण करणारी पीस पार्टी आणि मराठा संघटनांचा पाठींबा मिळवलेला शिवराज्य पक्ष यांचा समावेश आहे. कॉग्रेस राष्ट्रवादीला डोकेदुखी ठरणारी चौथी आघाडी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अस्तित्वात येत आहे. ही आघाडी कॉग्रेस पासून दूर राहणार आहे. शिवराज्य पक्षाला संभाजी ब्रिगेड, शिवा सारख्या आक्रमक संघटनांचा पाठिंबा आहे. त्यांचा प्रभाव मराठवाड्यातल्या मतदारसंघात आहे. तर भारिप बहुजन महासंघाची पकड विदर्भात आहे. मुंबईत 12 मतदार संघात दलित मुस्लिम मतदार 45 टक्के आहेत. त्याचा परिणाम या निवडणूकीत होऊ शकतो. कॉग्रेसचा परंपरागत दलित आणि मुस्लिम मतदार या चौथ्या आघाडीकडे गेल्यास कॉग्रेसला तिस-या आघाडीबरोबरचं या आघाडीशीही संघर्ष करावा लागणार . त्यामुळे आता कॉग्रेसला यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 24, 2009 10:03 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 24, 2009 10:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close