S M L

'आप'ल्या नेत्यांमुळे केजरीवाल दुखावले

Sachin Salve | Updated On: Mar 3, 2015 04:25 PM IST

'आप'ल्या नेत्यांमुळे केजरीवाल दुखावले

03 मार्च : दिल्ली विधानसभा पुन्हा काबिज केल्यानंतर आम आदमी पक्षात पुुन्हा एकदा गृहकलह निर्माण झालाय. या गृहकलहावर पक्षाचे समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपलं मौन सोडलंय. सध्या पार्टीत जे चाललंय, त्यामुळे मला अतिशय दु:ख होतंय अशी प्रतिक्रिया केजरीवाल यांनी दिलीये.

अरविंद केजरीवाल यांनी प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांच्यामुळे निर्माण झालेल्या वादावर आज सकाळपासून अनेक ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिलीये. दिल्लीच्या नागरिकांनी जो विश्वास आपल्यावर दाखवलाय त्याला यामुळे तडा जातोय अशी खंत केजरीवाल यांनी व्यक्त केली. अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यामुळे दिल्लीच्या जनतेच्या विश्वासाला तडा गेल्याचं केजरीवाल यांनी म्हटलंय. पण, या वादात आपण पडणार नाही, आपलं सर्व लक्ष हे सरकार चालवण्यावर असेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, उद्या आपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत वादाचे धणी ठरलेले प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 3, 2015 04:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close