S M L

मसरत आलमच्या सुटकेवरून संसदेत प्रचंड गदारोळ

Sachin Salve | Updated On: Mar 9, 2015 02:23 PM IST

मसरत आलमच्या सुटकेवरून संसदेत प्रचंड गदारोळ

loksabha34409 मार्च : हुरियतचा जहालवादी नेता मसरत आलम याच्या सुटकेवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. जोपर्यंत खुद्द पंतप्रधान यावर स्पष्टीकरण देत नाहीत, तोपर्यंत कामकाज सुरळीत न चालू देण्याचा इशारा विरोधकांनी दिला. याच विषयावरून विरोधकांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमून घोषणाबाजी केल्यामुळे राज्यसभेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करावं लागलं.

लोकसभेतही या विषयावरून विरोधकांनी 'प्रधानमंत्रीजी जवाब दो'ची घोषणाबाजी केली. त्यामुळे अखेर मोदींनीच लोकसभेत आलमच्या अटकेसंदर्भात स्पष्टीकरण दिलंय. मसारतच्या सुटकेवरून जो असंतोष पसरलाय, त्यात मीही सहभागी आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नाही, असं मोदी म्हणाले.

पण, त्यांनी विरोधकांना खडे बोल सुनवण्याची संधी सोडली नाही. आम्हाला देशभक्ती तुम्ही शिकवू नका, असं त्यांनी खडसावलं. यानंतर बोलताना भाजपनं काश्मीर सरकारमधून भाजपनं बाहेर पडावं अशी मागणी लोकसभेतले काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. त्यावर, तुमच्या सूचनेचा विचार नक्की करू असं उपहासात्मक उत्तर व्यंकय्या नायडूंनी दिलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 9, 2015 02:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close