S M L

'असंतोषात मीही सहभागी पण,आम्हाला देशभक्ती शिकवू नये'

Samruddha Bhambure | Updated On: Mar 9, 2015 06:44 PM IST

'असंतोषात मीही सहभागी पण,आम्हाला देशभक्ती शिकवू नये'

09 मार्च : जम्मू-काश्मिरमधील सरकार केंद्र सरकारशी चर्चा करून निर्णय घेत नाही, फुटीरतावादी नेत्याच्या सुटकेवरून देशात जो संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामध्ये आपणही सहभागी आहोत. पण देशाची एकता आणि अखंडता यावर सरकार कोणतीही तडजोड करणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेमध्ये स्पष्ट केलं. तसंच आम्हाला देशभक्ती शिकवू नये असे खडेबोलही मोदींनी विरोधकांना सुनावले.

हुरियतचा जहाल फुटरीतावादी नेता मसारत आलम याच्या सुटकेच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. जोपर्यंत खुद्द पंतप्रधान यावर स्पष्टीकरण देत नाहीत, तोपर्यंत कामकाज सुरळीत न चालू देण्याचा इशारा विरोधकांनी दिला. याच विषयावरून विरोधकांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमून घोषणाबाजी केल्यामुळे राज्यसभेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करावं लागलं. लोकसभेतही या विषयावरून विरोधकांनी 'प्रधानमंत्रीजी जवाब दो'ची घोषणाबाजी केली. त्यामुळे अखेर मोदींनीच लोकसभेत आलमच्या अटकेसंदर्भात स्पष्टीकरण दिले.

शून्यकाळात हा विषय उपस्थित झाल्यावर मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तरं दिली. मोदी म्हणाले, मसारतच्या सुटकेवरून जो असंतोष पसरलाय, त्यात मीही सहभागी आहे. फुटीरतावाद, दहशतवाद यासगळ्याविरोधात लढण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. मोदी गप्प का आहेत, यावर माझं उत्तर असं आहे की, आम्ही अशा विषयांवर गप्प बसणार नाही, असंही मोदींनी म्हटलंय. देशाची एकता आणि अखंडता यावर सरकार कोणतीही तडजोड करणार नाही. जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी आणि भाजपचे आघाडी सरकार आहे. मात्र, काश्मीरमधल्या सरकार केंद्र सरकारशी चर्चा करून निर्णय घेत नाही. या विषयावरून विरोधकांनी भाजपवर टीका करायला हरकत नाही. तो त्यांचा हक्कच आहे. पण आम्हाला कोणी देशभक्ती शिकवू नये,असे खडेबोलही त्यांनी यावेळी विरोधकांना सुनावले.

दरम्यान, यानंतर बोलताना भाजपनं काश्मीर सरकारमधून भाजपनं बाहेर पडावं, अशी मागणी लोकसभेतले काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. त्यावर, तुमच्या सूचनेचा विचार नक्की करू असं उपहासात्मक उत्तर व्यंकय्या नायडूंनी दिले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 9, 2015 02:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close