S M L

पक्षाच्या पराभवासाठी भूषण-यादवांनी प्रयत्न केले, 'आप'चा आरोप

Sachin Salve | Updated On: Mar 10, 2015 06:08 PM IST

kejriwal on bhushan 4410 मार्च : आम आदमी पक्ष आणि वाद हे आता एक समिकरणच बनलं असून पक्षाअंर्तगत वाद आणखी चिघळले आहे. योगेंद्र यादव, शांती भूषण आणि प्रशांत भूषण यांनी 'आप'चा पराभव करण्याचा प्रयत्न केला आणि पक्षविरोधी कारवाया केल्या असं 'आप'नं आज (मंगळवारी) अधिकृतपणे जाहीर केलं.

प्रसिद्धीपत्रक काढून 'आप'ने तिन्ही नेत्यांवर आरोप केले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत या नेत्यांनी पक्षाचा पराभव व्हावा यासाठी काम केलं, असा थेट आरोप या प्रसिद्धी पत्रकात करण्यात आलाय. या पत्रकावर मनीष सिसोदिया, गोपल राय आणि पंकज गुप्ता या तीन नेत्यांच्या सह्या आहेत. काही दिवसांपूर्वीच योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना पक्षाच्या सर्वोच्च समितीमधून काढून टाकण्यात आलं होतं. आता त्यांची पक्षातून हकालपट्टी होणार का, याबद्दलचा निर्णयही त्याच समितीत होईल, असं आप नेते आशुतोष यांनी सांगितलंय.

पत्रकात काय म्हटलंय ?

- योगेंद्र यादव, प्रशांत भूषण आणि शांती भूषण यांनी 'आप'चा पराभव करण्याचा प्रयत्न केला

- प्रशांत भूषण यांनी इतर दिल्लीबाहेरच्या कार्यकर्त्यांना दिल्लीत प्राचारासाठी येऊ दिलं नाही

- 'अरविंदला धडा शिकवायला हवां', असं प्रशांत भूषण यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं

- 'आप'ला देणगी देऊ इच्छिणार्‍या लोकांना प्रशांत भूषण यांनी परावृत्त केलं

- 'आप'विरोधी कारवाया करणार्‍या 'अवाम'ला भूषण यांनी मदत केली

- योगेंद्र यादव यांनी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात मीडियामध्ये बातम्या पेरल्या

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 10, 2015 06:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close