S M L

पृथ्वी प्रदक्षिणा घालणारं, सौर विमान थोड्याच वेळात भारतात उतरणार

Sachin Salve | Updated On: Mar 10, 2015 08:22 PM IST

पृथ्वी प्रदक्षिणा घालणारं, सौर विमान थोड्याच वेळात भारतात उतरणार

[wzslider] 10 मार्च : जगातील पहिल्या सौर विमानानं पृथ्वी प्रदक्षिणेचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर हे विमान आज भारतात लँड होणार आहे. भारतातील अहमदाबाद इथं हे विमान आज रात्री लँड होणार आहे.

'सोलार इम्पल्स 2' असं नाव असलेल्या या सौर विमानानं काल अबू धाबीहुन उड्डाण केल्यानंतर 13 तास 20 मिनिटांत ते मस्कतला पोहोचलं आणि 400 किलोमीटरचा प्रवास करून ओंमानमध्ये लँडिंग केलं. ओंमानहुन रवाना झालेलं हे विमान आता अहमदाबादमध्ये लँड होणार आहे. जगाला प्रदक्षिणा घालण्याचा निर्धार केलेल्या या सौर विमानाने हा पहिला टप्पा यशस्वीरत्या पार केला. आँद्रे बोर्शबर्ग हे या विमानाचे पायलट आहेत. मात्र सौर विमानाच्या मर्यादा लक्षात घेता, हे विमान जगप्रदक्षिणा करणं कठीण मानलं जातंय. जगात हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आलाय. या उपक्रमांत पुढच्या 5 महिन्यांमध्ये हा जगप्रदक्षिणेचा प्रवास चालणार आहे. 25 दिवसांच्या या प्रवासात 12 ठिकाणी हे विमान थांबणार आहे. आज अरबी समुद्रावरुन हे सौर विमान जाताना दिसेल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 10, 2015 07:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close