S M L

भूसंपादन विधेयक लोकसभेत मंजूर, आता राज्यसभेत कसोटी

Sachin Salve | Updated On: Mar 10, 2015 10:14 PM IST

भूसंपादन विधेयक लोकसभेत मंजूर, आता राज्यसभेत कसोटी

10 मार्च : भूसंपादन दुरस्ती विधेयकावरून मोठ्या वादंगानंतर अखेर आज मोदी सरकारने लोकसभेतली लढाई जिंकलीये. आज लोकसभेत भूसंपादन दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं. 11 सुधारणांसह या विधेयकाला आवाजी मतदानाने मंजुरी देण्यात आली. पण भाजपचा मित्रपक्ष शिवसेना मात्र लोकसभेत तटस्थ राहिला. तर सरकारला पाठिंबा देणार्‍या राजू शेट्टींनी आज या दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मतदान केलं.

भूसंपादन दुरस्ती विधेयक मांडण्यासाठी मोदी सरकारने जोरदार प्रयत्न केलाय. पण, त्यांच्या या प्रयत्नाला विरोधकांनीही तितक्याच तोडीने विरोध केला. गेली दोन आठवडे या विधेयकावरून संसदेत आणि संसदेबाहेर मोठा गदारोळ झाला. संसदेत मोदी सरकार विरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी विरोध केलाच. पण, एनडीएचा घटकपक्ष शिवसेनेनंही कडाडून विरोध केला आणि तो अखेरपर्यंत कायम आहे. शिवसेनेनं जाहीरपणे या विधेयकाला विरोध दर्शवला. शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी भाजपच्या नेत्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. पण तरीही उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका काही बदलली नाही. तर दुसरीकडे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही आक्रमक पवित्रा घेतं आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली.

खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं. भूसंपादन विधेयक शेतकर्‍यांच्या विरोधी नाही असा खुलासा पंतप्रधानांना दोन्ही सभागृहात करावा लागला. एवढंच नाहीतर जर विधेयक शेतकर्‍यांच्या विरोधी असेल तर ते मी स्वत:हून बदलण्यासाठी तयार आहे अशी ग्वाहीही दिली. पण, तरीही विरोधाकांचा विरोध काही मावळला नाही.

अखेरीस आज भाजपने आपल्या बहुमताच्या बळावर लोकसभेत विधेयक मंजूर करून घेतलं. 9 सुधारणांसह या विधेयकाला आवाजी मतदानाने मंजुरी देण्यात आली. यावेळी काँग्रेसने निषेध म्हणून वॉकआऊट केलं. तर शिवसेनेचे खासदार तटस्थ राहिले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यंकय्या नायडू यांना सुचवलेल्या सुधारणांचा यात समावेश नव्हता. त्यामुळे शिवसेनेच्या खासदारांनी आपली भूमिका मतदान न करून स्पष्ट केली. तर दुसरा घटकपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी अगोदर पाठिंबा दिला आणि आज विरोधात मतदान केलं. आता राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे सरकारची आता खरी कसोटी लागणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 10, 2015 08:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close