S M L

बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न

29 सप्टेंबर निवडणूक अर्ज मागे घेण्याचा मंगळवारचा शेवटचा दिवस होता. बंडखोरांची नाराजी दूर करण्याचे आणि त्यांची समजूत काढण्याचे सगळ्याचं पक्षांच्या पक्षश्रेष्ठींचे निकराचे प्रयत्न सुरू होते. काही जणांनी तडजोड करत आपली उमेदवारी मागे घेतली. तर काहींनी अजूनही बंडाचं निशाण फडकतं ठेवलंय. या निवडणुकीत प्रत्येक पक्षातल्या बंडोबांनी पक्षश्रेष्ठींच्या तोंडाला फेस आणला आहे. एरवी साहेबांचा शब्द झेलायला तयार असणारे कार्यकर्ते यंदा काही ऐकायला तयार नाहीत. अगदी पवारसाहेबांचं सुद्धा. त्यामुळेच देशपातळीवरचं राजकारण करणार्‍या पवारांना घरच्या मैदानात उतरावं लागलं. त्यांच्या सोलापूर जिल्ह्यातल्या दौैर्‍यात हेच चित्र पाहायला मिळालं. पंढरपूरमधून बंडखोरीची तयारी करणारे ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांच्या घरी जाऊन पवारांना त्यांची समजूत काढावी लागली. त्यांना पुढे संधी देण्याचा शब्द द्यावा लागला. तर तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातले काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अजित घोरपडे यांनी आपलं बंड आवरतं घेतलं. मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. घोरपडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवणार होते. पण पक्षश्रेष्ठींनी त्यांची समजूत घातली. कवठे महांकाळ इथं झालेल्या समेटाच्या बैठकीनंतर घोरपडेंनी हा निर्णय घेतला. यामुळे आर. आर. पाटील यांना दिलासा मिळाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 29, 2009 08:53 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 29, 2009 08:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close