S M L

कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार - मनमोहन सिंग

Samruddha Bhambure | Updated On: Mar 11, 2015 03:40 PM IST

coal manmohan

11 मार्च :  विशेष कोर्टाने पाठवलेल्या समन्समुळे दु:खी झालो आहे, पण मी कोणत्याही चौकशीला तयार असल्याची प्रतिक्रिया माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिली. कोळसा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष कोर्टाने मनमोहन सिंह यांना आरोपी म्हणून समन्स पाठवला आहे.

चौकशीनंतर सत्य समोर येईलच, असा विश्वासही मनमोहन सिंह यांनी व्यक्त केला आहे.

कोळसा खाण वाटप घोटाळयाप्रकरणी विशेष न्यायालयाने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना समन्स बजावले आहे. यापार्श्वभूमीवर मनमोहन सिंग यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. या प्रकरणी माजी कोळसा सचिव पी सी पारेख आणि उद्योजक कुमार मंगलम बिर्ला यांच्यासह आणखी तिघांनाही आरोपी म्हणून समन्स बजावण्यात आला आहे. त्याचबोरबर 8 एप्रिल रोजी या सर्वंना दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 11, 2015 02:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close