S M L

केजरीवालांच्या आग्रहामुळेच काँग्रेसचा पाठिंबा घेतला होता -यादव

Sachin Salve | Updated On: Mar 11, 2015 06:23 PM IST

केजरीवालांच्या आग्रहामुळेच काँग्रेसचा पाठिंबा घेतला होता -यादव

11 मार्च : आम आदमी पक्षात मोठी उलथापालथ सुरूच आहे. 'आप'ने योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्यावर केलेल्या आरोपांना यादव यांनी आज पत्रक काढून उत्तर दिलंय. केजरीवालांच्या आग्रहामुळे काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केलं होतं असा आरोप यादव यांनी केलाय. तसंच पक्षातच राहुन लढा देऊन असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवासाठी काम केलं असा गंभीर आरोप आम आदमी पार्टीने केला होता. एवढंच नाहीतर यादव आणि भूषण यांनी पक्षाच्या राजकीय समितीतून हकालपट्टी करण्यात आलीये. आपने केलेल्या आरोपामुळे योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी अरविंद केजरीवालांवर प्रतिहल्ला केलाय.

आपच्या पत्रकाला उत्तर म्हणून यादव आणि भूषण यांनी आज एक नवं पत्रक काढलंय. केजरीवालांच्या आग्रहामुळे काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केल्याचं योगेंद्र यादव यांनी म्हटलंय. काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करायला आमचा विरोध होता. दिल्लीबाहेर निवडणूक न लढवण्याचा निर्णय हा फक्त केजरीवालांचा होता असं योगेंद्र यादवांनी म्हटलंय.

तसंच अवामने केलेल्या आरोपांची चौकशी व्हायला हवी होती, पण केजरीवालांनी ती होऊ दिली नाही असा आरोपही यादव यांनी केलाय. या सगळ्यावर आम्ही आपमध्ये राहूनच संघर्ष करू, पक्षांतर्गत लोकपालने आमच्यावर असलेल्या आरोपांची चौकशी करावी असं आवाहन यादव यांनी केलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 11, 2015 06:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close