S M L

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता शेतकर्‍यांशी करणार 'मन की बात'

Samruddha Bhambure | Updated On: Mar 12, 2015 01:08 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता शेतकर्‍यांशी करणार 'मन की बात'

12 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहेत. येत्या 22 तारखेला हा कार्यक्रम होणार आहे. पंतप्रधानांनी आज (गुरुवार) ट्विटरवरून आपण शेतकर्‍यांशी संवाद साधण्याचे जाहीर केले आहे.

केंद्र सरकारने नुकतेच भूसंपादन विधेयक लोकसभेत मंजूर केले आहे. हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी शेतकर्‍यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी आतापर्यंत अनेकवेळा 'मन की बात'मधून देशवासियांशी संवाद साधलेला आहे. आता ते शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहेत. यासाठी त्यांनी शेतकर्‍यांना आपले प्रश्न मांडण्याचेही आवाहन केले आहे. त्यासाठी त्यांनी mygov.in या संकेतस्थळावर प्रश्न मांडण्यास सांगितले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 12, 2015 12:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close