S M L

वादग्रस्त विमा विधेयक राज्यसभेत मंजूर

Sachin Salve | Updated On: Mar 12, 2015 11:01 PM IST

वादग्रस्त विमा विधेयक राज्यसभेत मंजूर

rajasabha312 मार्च : वादग्रस्त विमा विधेयक अखेर आज (गुरुवारी) राज्यसभेत मंजूर करण्यात आलं. आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर झालं. यामुळे आता विमा क्षेत्रात 49 टक्के परकीय गुंतवणूक येऊ शकेल. काँग्रेससह काही विरोधकांनीही या विमा विधेयकाला पाठिंबा दिला.

याअगोदर विरोधी पक्षाने राज्यसभेत विधेयक अगोदरच रखडलेलं होतं. पण नव्याने का सादर करण्यात आलं असा सवाल उपस्थित केला. विरोधकांच्या प्रश्नाला उपसभापती पी.जे. कुरियन यांनी उत्तर देत सरकारला विधेयक सादर करण्यासाठी कोणतेही असे नियम नाही असं स्पष्ट केलं. विशेष म्हणजे, विमा विधेयक अगोदरच लोकसभेत मंजूर झालं होतं. आता राज्यसभेतही मंजुरी मिळाल्यानंतर विधेयक आता अध्यादेशात रुपांतरीत होईल. त्यानंतर राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर विधेयक अंमलात येईल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 12, 2015 09:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close