S M L

दांडीबहाद्दर खासदारांची मोदींनी केली कानउघडणी

Samruddha Bhambure | Updated On: Mar 18, 2015 01:42 PM IST

दांडीबहाद्दर खासदारांची मोदींनी केली कानउघडणी

18 मार्च : सभागृहात महत्त्वाच्या प्रसंगी गैरहजर राहणार्‍या भाजपाच्या दांडीबहाद्दर खासदारांना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (मंगळवारी) संसदीय पक्षाच्या बैठकीत खडे बोल सुनावले. मुंबईच्या खासदार पूनम महाजन आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनाही झाडाझडतीला सामोरे जावे लागले. भर बैठकीत उभे करून त्यांची कानउघडणी केली.

लोकसभेत भूसंपादन विधेयकावरील मतदानावेळी अनुपस्थित राहिलेल्या पक्षाच्या वीसही खासदारांना मोदींनी या बैठकीत चांगलेच फैलावर घेतले. यात पूनम महाजन, प्रीतम मुंडे, वरुण गांधी, बाबूल सुप्रीयो आदींचा समावेश होता. खुद्द मोदींनी सर्वांना बघू तरी द्या, असे म्हणत, या सर्व दांडीबहाद्दरांना भर बैठकीत उभे राहण्यास सांगितले. मोदींच्या आदेशानंतर सर्व खासदार निमूटपणे आपल्या जागेवर उभे झाले. जनतेने याचसाठी तुम्हाला निवडून दिले का? असा थेट सवाल मोदींनी त्यांना केला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 18, 2015 10:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close