S M L

काश्मिरात पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Samruddha Bhambure | Updated On: Mar 20, 2015 03:26 PM IST

काश्मिरात पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

20 मार्च : जम्मू-काश्मिरच्या कथुआ जिल्हय़ात दहशतवाद्यांनी एका पोलीस ठाण्यावर हल्ला केला. त्यातत्यामध्ये 1 सीआरपीएफ जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस दलाचा एक कॉन्स्टेबल शहीद झाला आहे. तर सीआरपीएफचे 2 जवान जखमी झाले आहेत. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सकाळी सहाच्या सुमारास 4 दहशतवाद्यांनी राजबाग पोलीस ठाण्यावर सशस्त्र हल्ला केला. दहशतवाद्यांनी पोलिस ठाण्यात घुसून पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. या वेळी पोलिसांनीही दहशतवाद्यांनी चोख प्रत्त्यूतर दिले. या धुमश्चक्रीत 2 पोलिस शहीद झाला असून, 1 दहशतवादीही ठार झाल्याचं समजतंय. यामध्ये दहशतवाद्यांचे 2 गट सामील असल्याचा संशय आहे. 1 गट पोलिसांना चकमकीत गुंतवून ठेवतोय तर दुसरा कथुआच्या आतल्या भागांत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळतीये. या चकमकीमुळे पठाणकोट हायबे बंद करण्यात आलाय. कथुआमधल्या या चकमकीविषयी गृहमंत्री संसदेत माहिती देण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. सध्या सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 20, 2015 10:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close