S M L

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, 2 दहशतवाद्यांचा खात्मा

Sachin Salve | Updated On: Mar 21, 2015 08:11 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, 2 दहशतवाद्यांचा खात्मा

21 मार्च : जम्मू काश्मीरमध्ये 24 तासांच्या आत दुसरा अतिरेकी हल्ला झालाय. सांबा सेक्टरमध्ये अतिरेक्यांनी आर्मी कॅम्पवर आज (शनिवारी) सकाळी हल्ला केला. अतिरेकी आर्मी कॅम्पमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. पण जवानांनी त्यांना बाहेरच रोखलं. त्यात एक मेजर, एक जवान आणि एक नागरिक जखमी झाले आहे. यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आलंय.

या हल्ल्यामुळे जम्मू-पठाणकोट हायवे बंद ठेवण्यात आलाय. आजच्या या हल्ल्याचा कालच्या हल्ल्याशी काही संबंध आहे का याचा तपास सुरू आहे. जम्मू-काश्मीरमधल्या कथुआमध्ये शुक्रवारी दशहतवाद्यांनी एका पोलीस स्टेशनवर हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी पोलिसांना ओलीस ठेवण्याचा प्रयत्न केला पण जवानांनी त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. या चकमकीत दोन दशहतवादी ठार झाले. तर या हल्ल्यात सातार्‍याचा जवान सूरज मोहिते हा शहीद झाला. त्याच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2015 03:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close