S M L

अ‍ॅम्बी व्हॅली विकून पैसे उभारा - सुप्रिम कोर्टाने

Samruddha Bhambure | Updated On: Mar 24, 2015 06:03 PM IST

subroto roy

24 मार्च :  गेल्या वर्षभरापासून तुरुंगात असलेल्या सहारा'श्रीं'च्या सुटकेसाठी विदेशातील तीन मालमत्तांसह मुंबईजवळच्या अ‍ॅम्बी व्हॅलीची विक्री करून पैसे उभारा, तसंच ही मालमत्ता विक्रीची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करा, असे आदेश सुप्रिम कोर्टाने काल (सोमवारी) दिले.

गेल्या वर्षभरापासून नवी दिल्लीच्या तिहार तुरुंगात असलेल्या सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या जामिनासाठी 10 हजार कोटी रुपयांच्या उभारणीसाठी सहाराला या मालमत्ता विकायच्या आहेत. गुंतवणूकदारांचे 20 हजार कोटी रुपये परस्पर अन्य योजनांमध्ये वळवल्याच्या प्रकरणात सेबीने सुरू केलेल्या कारवाईत रॉय सध्या गजाआड आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2015 11:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close