S M L

अटलबिहारी वाजपेयींना 'भारतरत्न' प्रदान

Samruddha Bhambure | Updated On: Mar 27, 2015 08:47 PM IST

अटलबिहारी वाजपेयींना 'भारतरत्न' प्रदान

27 मार्च : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आज संध्याकाळी देशातील सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. वाजपेयींची प्रकृती ठिक नसल्यामुळे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वतः त्यांच्या निवासस्थानी जाऊन वाजपेयींचा गौरव केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते तसंच माजी पंतप्रधान मनमोहन सिंगही यावेळी उपस्थित होते.

गेल्यावर्षी 25 डिसेंबरला वाजपेयींच्या वाढदिवशी राष्ट्रपती भवनाकडून त्यांना 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. 1998 ते 2004 या काळात ते सलग पंतप्रधानपदावर कार्यरत होते. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार्‍या काँग्रेसविरहीत सरकारचे ते पहिले पंतप्रधान होते. 50 हून अधिक वर्षे राजकारणात सक्रिय असलेल्या वाजपेयी यांना 'भारतरत्न' देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी सरकारने वाजपेयी यांना भारतरत्न देण्याची शिफारस प्रणव मुखर्जी यांच्याकडे केली होती.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 27, 2015 06:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close