S M L

गोवाः अपघातग्रस्त विमानातील अधिकार्‍यांचे मृतदेह सापडले

Samruddha Bhambure | Updated On: Mar 27, 2015 06:18 PM IST

Navy's Dornier aircraft crashes

27 मार्च : गोव्यामध्ये अपघातग्रस्त झालेल्या हिंदुस्तान एरॉनोटिक लिमिटेडच्या डॉर्नियर विमानातील लेफ्टनंट अभिनव नागोरी यांचा मृतदेह आज (शुक्रवारी) मिळाला आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.

नियमित गस्त घालण्यासाठी उड्डाण केलेल्या या विमान रात्री अकराच्या सुमारास गोव्याच्या समुद्रात 25 नॉटीकल मैलावर कोसळले. या विमानात मुख्य पायलट निखिल जोशी यांच्याव्यतिरिक्त लेफ्टनंट अभिनव नागोरी आणि सहायक पायलट लेफ्टनंट किरण शेखावत या महिला अधिकारी होत्या. निखिल जोशी या अपघातात बचावले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लेफ्टनंट किरण शेखावत यांचा मृतदेह काल (गुरुवारी) मिळाला असून, नागोरी यांचा मृतदेह आज विमानांच्या अवशेषामध्ये आढळून आला आहे. 

दरम्यान, भारतीय नौदलात 25 वर्षांपूर्वी दाखल झालेल्या डॉर्नियर या टेहेळणी विमानाचा अपघात होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. सराव सुरू असताना या विमानाचा तळाशी संपर्क तुटला होता. डॉर्नियर विमानाला अपघात होण्यामागील कारण अस्पष्ट असले, तरी या दोन इंजिनच्या विमानात बिघाड झाल्यानेच ते कोसळले, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 27, 2015 05:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close