S M L

नक्षलवादी हल्ल्याच्या दरम्यान वेळेवर मदत न मिळाल्याचा आरोप

9 ऑक्टोबर नक्षलवादी हल्ल्याच्या दरम्यान आम्हाला वेळेवर मदत मिळाली नाही,असा आरोप नागपूरमध्ये उपचार घेत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने केला आहे. तर शेजारच्या आंध्र आणि छत्तीसगडमधले नक्षलवादी गडचिरोलीतल्या नक्षलवाद्यांना मदत करत आहेत, असा दावा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांशी लढताना 17 पोलीस शहीद झाले. या सर्व शहीद पोलिसांचे मृतदेह गडचिरोलीला आणण्यात आले. तिथं पोलीस मुख्यालयासमोर या शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली. गृहमंत्री जयंत पाटील, गृहराज्यमंत्री नितीन राऊत हे यावेळी उपस्थितीत होते. या शहिदांवर दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत. शहिदांमधले बहुतेक जवान चंद्रपूर आणि गडचिरोलीमधले आहेत. तर पीएसआय चंद्रशेखर देशमुख सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील आहेत. गुरुवारी 300 सशस्त्र नक्षलवाद्यांनी भामरागडमध्ये हा हल्ला केला होता. या पार्श्वभूमीवर आता नक्षलवाद्यांच्या शोधासाठी C60 हे विशेष पोलीस दल रवाना करण्यात आलं आहे. एटापल्ली, धानोरा, कोरची या भागात सीमाबंदी केली आहे. दरम्यान जखमींवर नागपूरच्या कुणाल क्रिटीकल केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 9, 2009 08:54 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 9, 2009 08:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close