S M L

बाबरी मशीद विध्वंसप्रकरणी अडवाणींसह 21 जणांना नोटीस

Samruddha Bhambure | Updated On: Mar 31, 2015 04:41 PM IST

बाबरी मशीद विध्वंसप्रकरणी अडवाणींसह 21 जणांना नोटीस

31 मार्च : बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी आज (मंगळवारी) सुप्रीम कार्टाने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह 20 जणांना नोटीस पाठविली आहे. तसंच कोर्टाने या प्रकरणात क्लीन चीट देणार्‍या सीबीआयलाही नोटीस बजावली असून याबाबत खुलासा करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे.

बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाने 2010 मध्ये लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह 20 जणांना क्लीन चीट दिली होती.

अलाहाबाद हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात फैजाबादमधल्या हाजी मेहमदू अहमद यांनी सुप्रीम कार्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आज झालेल्या सुनावणीत कोर्टाने भाजप आणि संघ परिवाराच्या ज्येष्ठ नेत्यांसह सीबीआयला नोटिस पाठवली आहे. तसंच त्यावर उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.

बाबरी मशीद विध्वंसावेळी हाजी मेहमूद यांचे घर उद्‌ध्वस्त करण्यात आले होते. त्यांनी न्यायालयात आपल्याला एक पीडित म्हणून बाजू मांडण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 31, 2015 03:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close