S M L

पेट्रोल 49 पैशांनी तर डिझेल 1 रुपयांनी स्वस्त

Samruddha Bhambure | Updated On: Apr 1, 2015 07:27 PM IST

petrol_price_hike

01 एप्रिल : महागाईने त्रासलेल्या जनतेसाठी महिन्याच्या पहिल्याच दिवशी खुशखबर... पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात करण्यात आली असून त्यामुळे जनतेला थोडा तरी दिलासा मिळणार आहे. पेट्रोल प्रती लिटर 49 पैशांनी तर डिझेल प्रती लिटर 1 रुपया 21 पैशांनी स्वस्त झाले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती उतरल्याने पेट्रोल - डिझेलच्या दरात कपात झाली आहे. नव्या आर्थिक वर्षात बहुतेक सेवा महागल्या आहेत. त्यामुळे परिणामी महागाईचा सामना करावा लागणार्‍या सर्वसामान्यांसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली कपात दिलासादायक ठरणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 1, 2015 11:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close