S M L

'अच्छे दिन'ने बनवलं 'एप्रिल फूल', अनेक सुविधा महागणार

Samruddha Bhambure | Updated On: Apr 1, 2015 02:30 PM IST

'अच्छे दिन'ने बनवलं 'एप्रिल फूल', अनेक सुविधा महागणार

01 एप्रिल : 'अच्छे दिन' येणार म्हणून प्रतिक्षेत असलेल्या सामान्यांच्या खिशाला मात्र आजपासून मोठीच कात्री लागणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार रेल्वे , सेवाकर , बस , घर खरेदी अशा सगळ्याच क्षेत्रात तर आजपासून भाववाढ होणारचं आहे. पण त्याचं बरोबर विमानप्रवास, हॉटेलिंग, म्युच्युअल फंड आणि चिट फंडातील गुंतवणुकीसाठी सर्वसामान्यांना अधिक खर्च करावा लागणार आहे.

गेल्या महिन्यात सादर झालेल्या अर्थसंकल्पात सेवाकर 12.36 टक्क्यांवरून 14 टक्के करण्यात आला. सेवाकर सरसकट वाढल्याने पर्यटन , फोनचे बिल , हॉटेलिंग अशा विविध सेवांचे दर वाढले आहेत. बांधकामासाठी लागणार्‍या स्टील आणि कच्च्या मालावरचा कर वाढल्याने तसंच राज्य सरकार एफएसआयवरचा प्रिमियम वाढवण्याच्या विचारात असल्याने घर घेणं महाग होणार आहे.

रेल्वेचं प्लॅटफॉर्म तिकीटासाठी आजपासून पाच रुपयांऐवजी 10 रुपये मोजावे लागणार आहेत.मुंबईकरांसाठी खिशाला दुहेरी कात्री आहे कारण बेस्ट बसच्या दरातही आजपासून वाढ होणार आहे. याशिवाय खाजगी साध्याबसच्या दरातही एक ते दोन रुपयांनी , एसी बसच्या दरात पाच ते दहा रुपयांनी तर टॅक्सी भाड्यातही पाच ते दहा रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. वांद्रे-वरळी सी लिंकचा प्रवासही आजपासून महागणार.

याशिवाय चामड्याच्या बॅग , बूट आणि इतर वस्तू तसंच भारतीय बनावटीचे मोबाईल फोन यांच्या किंमतीतही वाढ होणार आहे. याशिवाय अवकाळी पाऊस, वाहतूक दरांची फेररचना तसेच व्यापारी आंदोलने यामुळेही सामान्य माणसांना महागाईचा फटका बसणार आहे. त्यामुळे अच्छे दिन म्हणत सत्तेवर आलेल्या सरकारने आजच्या एप्रिल फूलच्या दिवसापासून महागाई लादत आपल्याला फूलच बनवल्याची भावना सर्वसामान्य व्यक्त करत आहेत

प्रवास महागला

  • एसी बसच्या तिकिटात 5 ते 10 रु. वाढ
  • बेस्ट : साध्या बसचे किमान भाडे रु. 7वरून रु. 8/9वर
  • रेल्वे : प्लॅटफॉर्म तिकीट रु. 5 वरून 10 वर
  • टॅक्सी भाड्यातही पाच ते दहा रुपयांनी वाढ
  • वांद्रे-वरळी सीलिंक : लहान वाहनासाठीचा टोल 55 रु.वरून 60 रु.
  • विमान : बिझनेस क्लासने विमान प्रवास महागला

मालमत्ता कर

  • निवासी इमारतींसाठी मालमत्ता करात 11.74 टक्के
  • व्यावसायिक गाळ्यांसाठी 18 टक्के
  • औद्योगिक गाळ्यांसाठी 29.47 टक्के वाढ

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 1, 2015 02:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close