S M L

आजपासून घुमानमध्ये रंगणार साहित्य शब्दोत्सव

Samruddha Bhambure | Updated On: Apr 3, 2015 02:05 PM IST

Sahitya-samelan03 एप्रिल : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, सरहद्द संस्था आणि पंजाब राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने घुमान इथे आयोजित करण्यात आलेल्या 88 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनास आजपासून (शुक्रवार) सुरूवात होत आहे. साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा मुख्य सोहळा दुपारी 4 वाजता सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उद्घाटक तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

संमेलनाच्या निमित्ताने ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून घुमान येथील नामदेव महाराज दरबार ट्रस्ट इथून सकाळी दहा वाजता याची सुरूवात होणार आहे. घुमान शहरातील मुख्य रस्त्यावरून दिंडी फिरून संमेलन स्थळी तिची सांगता होईल. ग्रंथदिंडीच्या पालखीत संत नामदेवांची ब्रेललिपीतील गाथा ठेवण्यात येणार असल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी सांगितले.

दरम्यान, या संमेलनासाठी पुणे, मुंबई, नाशिकसह राज्यभरातून रसिक निघाले आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर संत नामदेवांच्या कर्मभूमीत हे संमेलन होत असल्यानं या संमेलनाबद्दल खूप उत्सुकता आहे. या साहित्यरसिकांच्या स्वागतासाठी घुमान नगरी सज्ज झाली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 3, 2015 10:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close