S M L

घुमान साहित्य संमेलन : 56 तासांचा कंटाळवाणा प्रवास

Samruddha Bhambure | Updated On: Apr 3, 2015 12:04 PM IST

घुमान साहित्य संमेलन : 56 तासांचा कंटाळवाणा प्रवास

02 एप्रिल :  साहित्य संमेलन म्हटलं की वाद आलेच. यंदा तर संमेलनापूर्वीच कार्यक्रमाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मुंबईहून घुमानसाठी निघालेली गाडी तब्बल 56 तासांनंतर बियासला पोहोचली. तिथून पुढे घुमानसाठीचा प्रवास साहित्यिकांनी बसने केला. महाराष्ट्राबाहेर पहिल्यांदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं आहे. त्यासाठीच्या गाडीला 56 तास लागले. मराठी रेल्वे मंत्री असूनही साहित्यिकांची एवढी गैरसोय झाल्याबद्दल साहित्यिकांनी संताप व्यक्त केला आहे.

बुधवारी मध्यरात्री 2च्या सुमाराला गुरूनानक एक्सप्रेस ही गाडी तेराशे साहित्यिक आणि पत्रकारांनाही घेऊन मुंबईहून निघाली. तिथून पुणे पुढे नाशिकला जाऊन ती बियाससाठी रवाना झाली. ही गाडी काल (गुरुवारी) सकाळी 11 वाजता बियासला पोहोचणं अपेक्षित होतं. पण गाडीला तब्बल 24 तास उशीर झाला आणि गाडी आज (शुक्रवारी) सकाळी साडे दहाच्या सुमाराला बियासला पोहोचली. तिथून हे सर्व साहित्यिक बसने अमृतसरला रवाना झाले. तिथून घुमानला जाण्यासाठी त्यांना 60 किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे.

दरम्यान, गाडीला उशीर झाल्याने सर्व कार्यक्रम पुढे ढकलला जाण्याचीही शक्यता आहे. ध्वजारोहणाचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान, संमेलनावर पावसाचंही सावट आहे. कालपासून घुमान परिसरात ढगाळ वातावरण होते आणि त्यात आज सकाळी या ठिकाणी हलकासा पाऊसही पडला. पुन्हा पाऊस आल्यास साहित्य रसिकांची गैरसोय होऊ शकते. संमेलनाच्या ठिकाणी पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने कार्यक्रम सुरळीत पार पडतात की नाही याबद्दल उत्सुकता आहे.

या सर्व भोंगळ कारभारावर आयबीएन लोकमतनं काही प्रश्नं उपस्थित केले आहेत.

  • 24 तासांच्या प्रवासासाठी विशेष गाडी 50 तासांपेक्षा जास्त वेळ का घेत आहे?
  • सुरेश प्रभूंसारखे मराठी रेल्वेमंत्री असताना इतक्या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या या गाडीकडे निघालेल्या या गाडीकडे रेल्वे मंत्रालयाने दुर्लक्ष का केलं?
  • 2 दिवसांपूर्वीच पंतप्रधानांनी गाड्यांना उशिर होत असल्याबद्दल रेल्वे मंत्र्यांना जाब विचारला होता. तरीही गाडीला 50 तासांपेक्षा जास्त उशीर झाला. म्हणजे रेल्वे मंत्र्यांनी पंतप्रधानांच्या सूचनेला गांभीर्यानं घेतलं नाही का?
  • आता तरी मराठी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू या प्रकरणात लक्ष घालणार का?
  • राज्य सरकार मध्यस्थी करून केंद्र सरकारकडे हा मुद्दा लावून धरणार का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 3, 2015 12:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close