S M L

जुनाट आणि कालबाह्य असलेले कायदे रद्द करणार - मोदी

Samruddha Bhambure | Updated On: Apr 5, 2015 07:02 PM IST

जुनाट आणि कालबाह्य असलेले कायदे रद्द करणार - मोदी

05 एप्रिल : देशातील अनेक कायदे कालबाहय झालेले आहेत. त्यामुळे न्यायप्रक्रिया गुंतागुंतीची बनली असून असे जुनाट आणि कालबाह्य असलेले कायदे रद्द करणार असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायदे आणि न्यायव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल घडवण्याचे संकेत रविवारी दिले. दररोज एक कायदा रद्द करण्याची माझी इच्छा आहे, असेही त्यांनी सांगितले. अशा प्रकारचे 1700 कायदे रद्द करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

दिल्लीत सुरु असलेल्या मुख्य न्यायाधीशांच्या परिषदेत मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्यायालयीन प्रक्रियेतील बदलांचा आढावा घेतला. न्यायव्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर वाढवायला हवा. त्यामुळे न्यायप्रक्रियेत मोठे बदल घडतील अशी अपेक्षा आहे, असेही मोदी म्हणाले. एखाद्या गुन्ह्याच्या तपासात ‘फॉरेंसिक सायन्स’ महत्वाची भूमीका निभावते. त्यामुळे न्यायाधीशांना ‘फॉरेंसिक सायन्स’बाबतचं ज्ञान असायला हवे.

न्यायालये आणि न्यायव्यवस्था बळकट असायला हवी. त्यावरच देशातील नागरिकांचा सर्वाधिक विश्वास आहे. भविष्यातील गरजांबाबत आतापासूनच विचार करायला हवा. त्यासाठी चांगल्या कायदा संस्था उभारायला हव्या आहेत, असे मोदी यांनी सांगितले. जुनाट आणि कालबाह्य असलेले कायदे रद्द करणार असल्याचे सांगत मोदी यांनी अशा प्रकारचे सुमारे 700 कायदे सरकार रद्द करणार असल्याचे सांगितले. दररोज एक कायदा रद्द करण्याची माझी इच्छा आहे, असेही त्यांनी सांगितले. अशा प्रकारचे एकूण 1700 कायदे रद्द करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

न्यायप्रक्रिया सरळ आणि सोपी करायला हवी. न्यायालयीन कामकाजात वापरण्यात येणारी भाषा कठिण आहे. ती सोपी व्हावी जेणेकरून ती सर्वसामान्य नागरिकांना समजेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 5, 2015 03:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close