S M L

राजधानी दिल्लीत हाय अलर्ट

Samruddha Bhambure | Updated On: Apr 5, 2015 07:03 PM IST

राजधानी दिल्लीत हाय अलर्ट

05 एप्रिल : राजधानी दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली असून गृह मंत्रालयाने दिल्लीमध्ये हाय अलर्ट जाहीर केला आहे.

सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान स्थित जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना दिल्लीत दहशतवाद’ हल्ला करण्याची शक्यता आहे. तसंच दिल्लीसह दिल्लीच्या सीमारेषा आणि देशाच्या संवेदनशील सीमारेषेवरही दक्षतेचे निर्देश देण्यात आले आहेत.

मार्चमध्ये जम्मू-पठाणकोट महामार्गावर सांबा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्करी छावणीवर हल्ला केला होता. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. या हल्ल्यातील दहशतवाद्यांकडे ग्रॅनाईडसह स्वयंचलित शस्त्रेही आढळून आली होती. सांबाच्याच धर्तीवर दिल्लीतही दहशतवादी हल्ल्याचा कट रचला जात आहे अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे राजधानीत सरकारी कार्यालये आणि व्हीआयपींच्या निवासस्थानी अधिक काळजी घ्यावी, अशी सूचना सुरक्षा यंत्रणांना देण्यात आली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 5, 2015 04:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close