S M L

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 3 पोलिस हुतात्मा

Samruddha Bhambure | Updated On: Apr 6, 2015 06:17 PM IST

pakistan ceasefire voilation

06 एप्रिल :  जम्मु काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील आशिपोरा भागामध्ये आज (सोमवारी) लष्करी गणवेशातील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये तीन पोलिस हुतात्मा झाले.

लष्करी गणवेशातील दहशतवाद्यांनी आज सकाळी पोलिसांची गाडी थांबवून त्यांना खाली उतरण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांना गोळ्या घालून ठार केलं. हे तीनही पोलिस कर्मचारी नि:शस्त्र होते, असं एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने सांगितले. हे पोलीस शेजारच्या एका गावातील प्रकरणाचा तपास संपवून परत येत असताना त्यांच्यावर हा प्रणघातक हल्ला झाला.

दरम्यान, उत्तर काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यामध्येही आज दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये एक पोलिस अधिकारी गंभीर जखमी झाला. 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 6, 2015 06:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close