S M L

आंध्र प्रदेशामध्ये पोलीस चकमकीत 20 चंदन तस्कारांचा खात्मा

Samruddha Bhambure | Updated On: Apr 7, 2015 01:50 PM IST

आंध्र प्रदेशामध्ये पोलीस चकमकीत 20 चंदन तस्कारांचा खात्मा

07 एप्रिल : आंध्र प्रदेशातील शेषाचलम जंगलात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत 20 चंदन तस्कारांचा खात्मा झाला. चित्तूर जिल्हयाच्या तिरूपती परिसरात ही चकमकीत झाली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी चंदन तस्करांच्या 150 जणांच्या टोळीसोबत पोलिसांची चकमक उडाली होती. सुरुवातीला तस्कारांकडूनच पोलिसांवर गोळीबार करण्यात आल्याच आंध्र प्रदेश पोलिसांनी सांगितल. या चकमकीत 20 चंदन तस्कारांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलं आहे. दरम्यान, पोलिसांची मोठी कुमक या परिसरात दाखल झाली असून, त्यांनी संपूर्ण परिसराला घेरलं आहे. त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

शेषाचलमच्या जंगलात मोठयाप्रमाणात चंदनाची तस्करी केली जाते. त्यामुळे या परिसरात पोलिसांकडून नेहमी कारवाई करण्यात येते. याच जंगलातून दहशत माजवणार्‍या विरप्पनचाही पोलिसांनी चकमकीत खात्मा केला होता.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 7, 2015 12:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close