S M L

तेलंगणमध्ये पोलिस चकमकीत 5 दहशतवाद्यांना कंठस्नान

Samruddha Bhambure | Updated On: Apr 7, 2015 01:49 PM IST

तेलंगणमध्ये पोलिस चकमकीत 5 दहशतवाद्यांना कंठस्नान

07 एप्रिल : तेलंगणमधील वारंगल येथे पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करणर्‍या 5 संशयित दहशतवाद्यांचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सिमीचा सक्रीय सदस्य विकरुद्दीन अहमदचाही समावेश आहे.

मंगळवारी सकाळी वारंगलमधील तुरुंगातून 5 संशयित दहशतवाद्यांना हैदराबादमध्ये नेले जात होते. या दरम्यान पाचही दहशतवाद्यांनी पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात या पाचही कैद्यांचा मृत्यू झाला.

हे पाचही कैदी सिमीचे सदस्य असल्याचा संशय होता. विकरुद्दीनवर हत्येचे गुन्हे दाखल असून दहशतवादी कारवायांमध्येही त्याचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 7, 2015 01:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close