S M L

मुख्य निवडणूक आयुक्तपदी डॉ. नसीम झैदी

Samruddha Bhambure | Updated On: Apr 9, 2015 01:14 PM IST

मुख्य निवडणूक आयुक्तपदी डॉ. नसीम झैदी

09 एप्रिल :  केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी डॉ. नसीन झैदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. झैदी येत्या 19 एप्रिलला आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एच. एस. ब्रम्हा 19 एप्रिलला निवृत्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा मंत्रालयाने नव्या आयुक्तांच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी डॉ. झैदी यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदासाठी घोषणा केली.

डॉ. झैदी हे 1976च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते नागरी विमान उड्डाण मंत्रालयात कार्यरत आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 9, 2015 01:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close