S M L

नक्षलवाद्यांचा तीन दिवसातील चौथा हल्ला, 4 जवान शहीद

Samruddha Bhambure | Updated On: Apr 13, 2015 06:07 PM IST

»naxal34313  एप्रिल :  छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये पुन्हा एकदा पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत सुरक्षा दलाचे 4जवान शहीद झाले आहेत. तर 8 जवान जखमी आहेत. जखमी जवानांना जगदलपूर इथून हेलिकॉप्टरने रायपूरकडे नेण्यात येत आहे. शनिवारपासून सुरक्षा दलांवर झालेला हा चौथा हल्ला आहे.

दोनच दिवसांपूर्वीही मोठी चकमक उडाली होती. यामध्ये एसटीएफचे (स्पेशल टास्क फोर्स) 7 जवान शहीद आणि 10 जवान जखमी झाले होते. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील पीडमेलमध्ये ही घटना घडली होते. एसटीएफ जवानांच्या सर्च ऑपरेशनवेळी नक्षलवाद्यांनी हा भ्याड केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत सात जवानांना वीरमरण आलं होतं.

रविवारी माओवाद्यांनी कांकेर जिल्ह्यात खाणकामाला लावण्यात आलेल्या 17 गाडया जाळल्या. तर बांदे पोलीस ठाण्याच्या हद्दीत छोटो बेथिया भागात गस्तीवर असलेल्या बीएसएफ जवानांवर माओवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर हे माओवादी जंगलात पळून गेले.

ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात चार जवानांना वीरमरण आलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 13, 2015 06:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close