S M L

ओबामांकडून 'टाइम'मधून मोदींचे कौतुक!

Samruddha Bhambure | Updated On: Apr 16, 2015 08:59 PM IST

modi obama chya16  एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यातील मैत्रिपूर्ण संबंधांमध्ये एक नवा अध्याय जोडला गेला. जगातील प्रभावशाली 100 व्यक्तींची यादी 'टाइम' मासिकाने प्रसिद्ध केली. यामध्ये मोदी यांचाही समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर 'टाइम'मध्ये ओबामा यांनी मोदी यांच्या आतापर्यंतच्या वाटाचालीवर आधारित लेख लिहिला आहे.

'इंडियाज रिफॉर्मर इन चीफ' असे शीर्षक असलेल्या या लेखामध्ये ओबामा यांनी मोदी यांचा प्रवासाबद्दल लिहिले आहे. गरिबीतून वाटचाल करीत देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास ओबामा यांनी लेखामध्ये त्यांच्या नजरेतून शब्दबद्ध केला आहे. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशाचे सर्वोच्च पद मोदी सांभाळत आहेत. गरिब कुटुंबातून पुढे येऊन त्यांनी केलेला हा प्रवास बदलत्या भारताचे चित्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून या लेखाबद्दल ओबामांचे आभार मानले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2015 08:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close