S M L

मसरत आलमला जम्मू-काश्मीर पोलिसांकडून अटक

Samruddha Bhambure | Updated On: Apr 17, 2015 02:12 PM IST

मसरत आलमला जम्मू-काश्मीर पोलिसांकडून अटक

17  एप्रिल : काश्मीरमधील फुटीरतावादी चळवळीचा नेता मसरत आलम याला आज (शुक्रवारी) जम्मू-काश्मीर पोलीसांनी अटक केली. मसरत आलम आणि सईद अली गिलानी या दोघांना गुरुवारपासून नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं.

काही दिवसांपूर्वी श्रीनगरमध्ये हुरियत कॉन्फरंसचे हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष सय्यद अली शाह गिलानी यांच्या स्वागतासाठी आलम याने पाकिस्तानचा झेंडा फडकाविल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली होती. मसरत आलम आणि गिलानी यांनी भारतीय लष्कराकडून दहशतवादी समजून मारल्या गेलेल्या काश्मिरी तरूणांच्या हत्येच्या निषेधार्थ त्राल येथे मोर्चाचे आयोजन केले होते. या पार्श्वभूमीवर त्याला अटक करण्यात आल्याचे समजते.

आलम याला श्रीनगरमधील शहीदगुंज पोलिस ठाण्यात त्याला नेण्यात आले आहे. न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर केल्यानंतर त्याला तुरुंगात पाठविण्यात येईल असे सांगण्यात आले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 17, 2015 12:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close