S M L

राहुल गांधी लागले कामाला, शेतकर्‍यांची घेतली भेट

Sachin Salve | Updated On: Apr 18, 2015 04:41 PM IST

राहुल गांधी लागले कामाला, शेतकर्‍यांची घेतली भेट

18 एप्रिल : मोठ्या आणि बहुचर्चित सुट्टीवरून परतल्यानंतर दोन दिवसांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी कामाला लागले आहे. राहुल गांधी यांनी आज (शनिवारी) शेतकर्‍यांची भेट घेतली. भूसंपादन विधेयकाविरोधातली काँग्रेसची रणनीती ठरवण्यासाठी ही भेटी घेतल्याचं बोललं जातंय.

ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अगोदरच राहुल गांधी यांनी बॅगपॅक करून अज्ञातस्थळी रवाना झाले होते. तब्बल दोन महिने पक्षाला वार्‍यावर सोडून राहुल गांधी बेपत्ता झाले होते. राहुल गांधी कुठे असतील याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले गेले. अखेर दोन दिवसांपूर्वी 16 एप्रिलला राहुल गांधी म्यानमारहुन भारतात परतले. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर राहुल गांधी आता कामाला लागले आहे. राहुल गांधींनी आज किसान खेतमंजूर रॅली आयोजित केली. याच पर्थ्वभूमीवर त्यांनी शेतकर्‍यांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासनही दिलं. उद्या(रविवारी) काँग्रेस भूसंपादनविरोधात मोठा मोर्चा काढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या भेटी महत्त्वाच्या मानल्या जातायेत. राहुल गांधी परतल्याचं जाहीर करण्यासाठी आणि भूसंपादन विधेयकाविरोधातली पक्षाचं शक्तीप्रदर्शन दाखवून देण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 18, 2015 01:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close