S M L

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या सत्रात भूसंपादनाचा मुद्दा तापण्याची शक्यता

Samruddha Bhambure | Updated On: Apr 20, 2015 12:46 PM IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या सत्रात भूसंपादनाचा मुद्दा तापण्याची शक्यता

20  एप्रिल : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या टप्प्याला आजपासून सुरुवात होत आहे. मसरत आलम प्रकरण, भूसंपादन दुरुस्ती विधेयक, अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई, यासारख्या विविध मुद्द्यांवरून हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.

काँग्रेसने काल (रविवारी) दिल्लीत रामलीला मैदानावर भूसंपादन दुरुस्ती विधेयकाविरोधात 'किसान रॅली' आयोजित करून मोदी सरकार शेतकरीविरोधी असल्याची टीका केली होती. लोकसभा निवडणुकीत उद्योगपतींकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठीच भूसंपादन विधेयकात बदल केल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे. या रॅलीचे पडसाद आजपासून सुरू होणार्‍या अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे. काँग्रेस या मुद्द्यावर चांगलाच आक्रमक पवित्रा घेऊ शकते. याशिवाय विरोधकांनी अडथळे आणले नाही तर प्रलंबित असलेली अनेक विधेयक या अधिवेशनात मार्गी लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एक ट्वीट केलं आहे. हे अधिवेशन फलदायी ठरावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

 

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2015 09:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close