S M L

कृषिमंत्र्यांनी शेतकर्‍यांच्या आत्महत्येबद्दल चुकीची माहिती दिली -चव्हाण

Sachin Salve | Updated On: Apr 21, 2015 02:10 PM IST

ashok_chavan_321 एप्रिल : लोकसभेत आजही महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा मुद्दा गाजला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांना या मुद्यावरून चांगलंच धारेवर धरलं. केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह शेतकर्‍यांच्या आत्महत्यांबाबत चुकीची आकडेवारी सांगून सभागृहाची दिशाभूल करत असल्याचा आरोप अशोक चव्हाणांनी केलाय.

महाराष्ट्रात अवकाळी पावसानंतर राज्यात फक्त 3 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात अशी खळबळजनक माहिती केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी सोमवारी लोकसभेत शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चर्चेदरम्यान दिली होती. राज्य सरकारने दिलेली आकडेवारीच आपण सादर केली पण ही आकडेवारी अयोग्य आहे आहे असंही सिंह यांनी स्पष्ट केलं होतं. कृषिमंत्र्यांच्या या निवेदनाचा आज काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी चांगलाच समाचार घेतला. राज्याची नाचक्की तर झालीच पण, सिंह यांनी चुकीची माहिती सादर केली असा आरोप चव्हाण यांनी केला. तर राधामोहन सिंह यांनी महाराष्ट्र सरकारने अवकाळी पावसानंतर राज्य सरकारने सादर केलेली आकडेवारीच आपण सभागृहात मांडली असल्याचं स्पष्टीकरण दिलंय. त्यावर अशोक चव्हाणांनी केंद्र सरकारच शेतकरी आत्महत्यांबाबत जाणिवपूर्वक दिशाभूल करत असल्याचा आरोप केलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 21, 2015 01:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close