S M L

अरविंद केजरीवाल 'हिटलर', शांती भूषण यांचं टीकास्त्र

Sachin Salve | Updated On: Apr 21, 2015 10:58 PM IST

अरविंद केजरीवाल 'हिटलर', शांती भूषण यांचं टीकास्त्र

21 एप्रिल : आम आदमी पक्षातून योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीये. प्रशांत भूषण यांचे वडील आणि आपचे सदस्य शांती भूषण यांनी केजरीवाल यांच्यावर सडकून टीका केली असून त्यांना हिटलर अशी उपमा दिलीये. अऱविंद केजरीवाल यांना ओळखण्यात आपण मोठी चुकी केलीये. केजरीवाल हिटलर सारखं काम करतायत अशी टीका शांती भूषण यांनी केलीये.

विशेष म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणुकीत शांती भूषण यांनी भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्यापेक्षा उत्तम असल्याचं म्हटलं होतं. सत्तेवर विराजमान झाल्यानंतर आपमध्ये यादवी माजली होती. अखेरीस आपने सोमवारी रात्री योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी पक्षातून हकालपट्टी केलीये. त्यानंतर केजरीवाल यांच्याविरोधात पक्षातूनच तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 21, 2015 08:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close