S M L

लोकसभेत गांधी घराण्याचे दोन युवराज अन् चर्चा !

Sachin Salve | Updated On: Apr 22, 2015 02:44 PM IST

लोकसभेत गांधी घराण्याचे दोन युवराज अन् चर्चा !

22 एप्रिल : लोकसभेचं आजचं कामकाजही अपेक्षेप्रमाणेच वादळी ठरलं. पण त्यातही प्रश्नोत्तराचा तासाचे खास आकर्षण राहिले ते गांधी घराण्याचे दोन युवराज....आणि ते म्हणजे राहुल गांधी आणि वरूण गांधी ...हे दोन्ही गांधी बंधू तसे परस्परांच्या विरोधात म्हणजेच एक सत्ताधारी तर दुसरा विरोधक असले तरी या दोघांनीही आजचा शुन्यप्रहर चांगलाच गाजवला.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी भूसंपादन आणि नेट न्युट्रलिटीचा प्रश्न उपस्थित केला. तर भाजप खासदार वरूण गांधी यांनी राष्ट्रीय युवा धोरणाचा मुद्दा उपस्थित केला. थोडक्यात दोघांनीही प्रश्न विचारून संसदेतलं आपलं अस्तित्व दाखवून दिलंय. राहुल गांधींच्या नेट न्युट्रलिटीच्या प्रश्नावर कायदामंत्री रवी शंकर प्रसाद यांनी तर भुसंपादनाच्या प्रश्नावर नितीन गडकरींनी प्रत्युत्तर दिलं. एकूणच आजच्या शुन्यप्रहराच्या निमित्ताने दोन्ही गांधी पहिल्यादाच सर्वांच्याच चर्चेला विषय ठरलेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2015 02:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close