S M L

'आप'च्या रॅलीत शेतकर्‍याची आत्महत्या

Sachin Salve | Updated On: Apr 22, 2015 03:43 PM IST

'आप'च्या रॅलीत शेतकर्‍याची आत्महत्या

22 एप्रिल : नवी दिल्लीत जंतरमंतरवर आम आदमी पक्षाच्या रॅलीमध्ये एका शेतकर्‍याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. गजेंद्र सिंह असं या शेतकर्‍याचं नाव आहे. या शेतकर्‍यानं भर रॅलीत झाडाला गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. आपच्या कार्यकर्त्यांनी धाव घेऊन त्याला खाली उतरवलं. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

भूसंपादन विधेयकाच्या विरोधात आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली जंतरमंतरवर रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. मात्र, या रॅलीला गालबोट लागलंय. रॅली सुरू असताना राजस्थानचा रहिवासी असलेल्या गजेंद्र सिंह शेतकर्‍यानं गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण कार्यकर्त्यांचं यावर वेळीच लक्ष गेलं, आणि त्यांनी या शेतकर्‍याला खाली उतरवलं. पोलिसांनी या शेतकर्‍याला ताब्यात घेतलं आणि राममोहन लोहिया हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादम्यान त्याचा मृत्यू झाला. या शेतकर्‍यांने सुसाइड नोटही लिहून ठेवली होती. "मी मुळचा राजस्थान इथला रहिवासी आहे. माला 3 मुलं आहे. पण अवकाळी पावसामुळे पिकाचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे माझ्या वडिलांना मला घरातून बाहेर काढलं. जय जवान, जय किसान..!" शेतकर्‍यांच्या आत्महत्येमुळे देशभरात खळबळ उडालीये. ही घटना धक्कादायक आहे. दिल्लीत भर रॅलीत एक शेतकरी आत्महत्या करतोय ही चिंताजनक बाब आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी दिली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2015 03:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close