S M L

केदारनाथच्या चरणी राहुल गांधी

Sachin Salve | Updated On: Apr 24, 2015 03:14 PM IST

केदारनाथच्या चरणी राहुल गांधी

rahul gandhi 43424 एप्रिल : 56 दिवसांच्या सुट्टीनंतर परतलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी बरेच सक्रिय झाले आहे. संसदेच्या कामातून पुन्हा दोन दिवसांची सुट्टी घेऊन ते केदारनाथला गेले आहे. राहुल गांधी यांनी पायी प्रवास करून दर्शन घेतले आहे. यावेळी ते यात्रेकरूनमध्येही सहभागी झाले.

आजपासून केदारनाथचे दरवाजे भक्तांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे. या निमित्ताने राहुल गांधी दोन दिवसांच्या केदारनाथ दौर्‍यावर आहेत..त्यांनी आज केदारनाथचं दर्शन घेतलं. गौरीकुंडपर्यंतचा प्रवास राहुल गांधींनी पायी केला. काल गौरी कुंड येथे राहुल गांधींनी स्थानिकांशी संवाद साधला. काँग्रेस नेत्या अंबिका सोनीही सोबत त्यांच्यासोबत आहेत. राहुलला काँग्रेसचा नेता म्हणून पुढे आणण्याच्या काँग्रेसच्या अनेक प्रयत्नांपैकी हा आणखी एक प्रयत्न यादृष्टीने याकडे पाहिलं जातंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2015 03:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close