S M L

पंतप्रधानांनी केला मेट्रोने प्रवास

Sachin Salve | Updated On: Apr 25, 2015 03:21 PM IST

पंतप्रधानांनी केला मेट्रोने प्रवास

25 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवारी) दिल्ली मेट्रोनं प्रवास केलाय. पंतप्रधानांनी आज सकाळी 9.55 ते 10.10 वाजेपर्यंत दिल्लीतील रेसकोर्स ते धौला कुआँ, द्वारका या मार्गावर मेट्रोने प्रवास केला. या प्रवासात पंतप्रधानांसोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सोबत होते. मेट्रोच्या प्रवासात आपल्याला मजा आली असं टिवट् पंतप्रधानांनी केलंय. तसंच त्यांनी दिल्ली मेट्रो घडवणारे ई.श्रीधरन यांचं कौतुक केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच मेट्रोने प्रवास करून सर्वांना चकित केलंय. मेट्रोच्या प्रवासाचे फोटो पंतप्रधानांनी आपल्या टिवट्‌र अकाऊंटवर पोस्ट केले आहे. पंतप्रधान आज एनआईएचं उद्घाटनासाठी जात होते. लोकांना वाहतूक कोडींचा फटका बसू नये म्हणून त्यांनी मेट्रोने प्रवास केल्याचं सांगितलं जातंय. त्यांच्यासोबत प्रवासात केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, प्रकाश जावडेकरही सोबत होते. पंतप्रधानांनी मेट्रोने प्रवास करून एक नवा आदर्श घालून दिलाय. आम्ही पण यापुढे मेट्रोने प्रवास करू अशी प्रतिक्रिया जावडेकर यांनी दिली. पंतप्रधानांनीही मेट्रो प्रवासानंतर टिवट् केलंय. पंतप्रधान म्हणतात, "श्रीधरनजी मला नेहमी सांगायचे की, दिल्ली मेट्रोचा अनुभव घ्या. आज तसं करायची संधी मिळाली. खूप मजा आली. धन्यवाद श्रीधरनजी !"

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2015 03:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close