S M L

भुकंपामुळे बिहारमध्ये 22 जणांचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Apr 25, 2015 05:32 PM IST

भुकंपामुळे बिहारमध्ये 22 जणांचा मृत्यू

bihar 3325 एप्रिल : नेपाळमध्ये आलेल्या महाप्रलयकारी भूकंपाचा भारतालाही हादरा बसलाय. उत्तरभारतासह दिल्ली, बिहार, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालला भूकंपाचा हादरा बसलाय. उत्तरभारतात 23 जणांचा मृत्यू झालाय.  बिहारमध्ये आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झालाय. बिहारच्या सितमगढमध्ये सहा लोकांचा मृत्यू झालाय. तर दूरदर्शन वाहिनीनेने दिलेल्या माहितीनुसार उत्तरप्रदेशमध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय.

भूकंपाचे केंद्रबिंदू नेपाळ असल्यामुळे बिहार, उत्तरप्रदेश, दिल्ली, राजस्थानला धक्के बसले आहे. बिहारमध्ये तातडीने एनडीआरएफच्या 4 टीम मदतीसाठी रवाना झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीने बैठक बोलावलीये. भूकंपग्रस्त राज्यातील मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांनी माहिती मागवली असून त्यानुसार मदत पुरवली जाणार आहे. तर उत्तर प्रदेश सरकारने भूकंपग्रस्तांसाठी मदतीची घोषणा केलीये. मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जर जखमींना 20 ते 22 हजार मदत दिली जाणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2015 05:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close