S M L

नेपाळच्या भूकंपात 2 भारतीयांचा मृत्यू, 546 जण परतले

Sachin Salve | Updated On: Apr 26, 2015 02:19 PM IST

earthquake_nepal (11)26 एप्रिल : नेपाळमध्ये आलेल्या महाभूकंपात आतापर्यंत 2 भारतीय नागरिकांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत 3 विमानांमधून 546 भारतीयांना परत आणण्यात यश आलंय.

मात्र, अजूनही महाराष्ट्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि केरळमधले अनेक नागरिक नेपाळमध्ये अडकलेले आहेत.

त्याशिवाय मुलींचा 14 वर्षांखालचा फुटबॉलचा संघ काठमांडूमध्ये अडकलाय. त्यांच्या सुटकेसाठी प्राधान्य देण्यात आलंय.

महाराष्ट्रातून काठमांडूसाठी वेगवेगवळ्या टूर्स कंपन्यांकडून गेलेले पर्यटक सुखरूप आहे. विमान सेवा सुरू होताच सर्व पर्यटकांना भारतात परत आणण्याची सोय करण्यात येणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2015 02:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close